Land sarve

तलाठी कार्यालयाकडून सात-बारा उतारा मिळवून देणे, जमीन मोजनीसंबधी भुमि-अभिलेख कार्यालयाशी संर्पकात राहून जमीन मोजनीसाठी आवश्यक पुर्वतयारी करणे इत्यादि सभासदांच्या कामासाठी संस्थेच्या माध्यमातून सशुल्क सहाय्य पुरविणे

फळसेवाडीत आणि आसपासच्या परिसरात आपल्या पूर्वजांनी / वाडवडीलांनी कमावलेली आणि राखून ठेवलेली जमीन आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर किंवा त्या काळाच्या आसपास जन्मलेली पिढी शिक्षणाच्या आणि नोकरीधंद्याच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतरित होऊन बहुतांशी काळ मुंबईत वास्तव्यास असल्याकारणे त्यांस त्यांच्या गावच्या इस्टेटी / जमीनीसंबधी नीट माहीती नाही किंवा उपलब्ध कागदोपत्री असलेल्या जमीनीचा ठावठिकाण माहीत नाही. गावी वास्तव्यास असलेल्या पिढीसही त्यांच्या जमीनजुमल्याची नीटशी माहिती नसून वर्षांनुवर्षे चालत आलेल्या वहीवाटीनुसार त्यांस आपल्या जमीनीचे ठिकाण माहित असले तरी त्या जमीनीच्या पक्क्या सीमा माहीत नाहीत.

या जमीन मालकीसंबधी असलेल्या संभ्रमाची जाणीव कार्यकारीणी सदस्यांस प्रत्येकवेळी होत असून ब्राम्हणाची विहीर असलेल्या जमीनीचा गट क्रमांक कोणता व ती कोणाच्या जागेत आहे, डोहाच्या चिंचेजवळ प्रायोजित विहीरीसाठी असलेल्या जमीनीचा गट क्रमांक कोणता व ती कोणाची आहे किंवा नुकतीच बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची जागा कोणाच्या सीमेमध्ये होती / आहे याबाबत संभ्रम निर्माण झाले.

ग्रामस्थांमधील सुसंवादामुळे आणि सामंजस्यामुळे जरी सार्वजनिक कामासाठी जमीन उपलब्ध झाली तरी कायदेशीर कागदपत्रे म्हणजेच बक्षीसपत्र किंवा करारपत्र पूर्ण करण्यासाठी यातून मार्ग मिळत नाही त्यामुळे जमीनीच्या ठिकाणांबाबत, गट क्रमांकाबाबत व सीमांबाबत स्पष्टता येणे जरुरीचे आहे.

आज आपल्या जमिनीची माहिती करुन घेणे ही काळाची गरज आहे. काही जागरुक ग्रामस्थांनी त्यांच्या स्वत:च्या जमीनीची माहीती मिळविण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत परंतू हे प्रयत्न फक्त सात-बारा उतारे मिळविण्यापर्यंतच मर्यादित राहिले. वाडीतील बहुतांशी ग्रामस्थ मुंबईत वास्तव्यास असल्यामुळे आणि फक्त गणपती उत्सवादरम्याण किंवा शाळांच्या उन्हाळी सुट्टीत त्यांचे गावी जाणे होत असल्यामुळे त्यापुढील कार्यवाही म्हणजे भुमि अभिलेख कार्यालयाशी संर्पक करुन जमीनीचा ठावठिकाणा शोधने आणि जमीन मोजणी करुन घेणे होत नाही. त्यामुळे आजच्या पिढीस त्यांची किती जमीन आहे याची माहिती कदाचित सात-बारा उतार्‍यावरुन मिळेल परंतू आपली जमीन कोठे आहे, त्या ठिकाणाचे नाव काय आहे आणि त्या जमीनीत झाड-पेड असल्यास ते कोणते आहे तसेच त्या जमीनीचा काय उपयोग करता येईल याबद्दल काही माहिती नाही.

आता ग्रामस्थास भुमि अभिलेखाच्या संकेतस्थळाहून सात-बारा उतारे मिळत असले आणि तलाठी कार्यालयातून साक्षांकित सात-बारा उतारे मिळविण्यासाठी खर्च करणे किंवा भुमि अभिलेखा कार्यालयात जमीन मोजनीसाठी पैसे भरणे खर्चिक वाटत नसले तरी या कामासाठी गावी हेलपाटे घालून प्रवासावर पैसे आणि वेळ खर्च करणे शक्य होत नसल्यामुळे त्यांचेकडून नोकरीधंद्यास असतांना जमीनीचा ठावठिकाणा शोधण्याबाबत काहीच हालचाल केली जात नाही. निवृत्त झाल्यावर काही ग्रामस्थ याबाबत प्रयत्न सुरु करतात परंतू त्यावेळी वय व तब्येत साथ देत नसल्यामुळे धावपळ करणे शक्य होत नाही.

ग्रामस्थांची बहुतांशी जमीन आज लहान तुकड्या तुकड्यात विभागली गेलेली असली तरी आपल्या पूर्वजांनी / वाडवडीलांनी कष्टाने डोंगर उतारावर मेरा बांधून तयार केली आहे. त्याकाळी उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसतांना नड असतांनादेखील ती न विकता पुढील पिढीसाठी राखुन ठेवली आहे. आजच्या काळात त्या जमीनीपासून काही उत्पन्न मिळत नसले तरी कोण जाणे पुढील काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग विस्तारीत झाल्यावर तालूका ठिकाणांपासून आपली वाडी जवळच्या अंतरावर असल्यामुळे आपल्या स्वत:च्या जमीनीत आपण काही उद्योगधंदा उभारु शकू. त्यावेळी आपणांस किंवा आपल्या पुढील पिढीस जमीन शोधण्यापासून जमीन मोजणी इत्यादि बाबी करावयास लागल्यास ते फार वेळखाऊ होईल. महत्वाचे म्हणजे पुढील पिढीस आपल्या जमीनीबाबत काहीच माहीती नसल्यामुळे फक्त संशयामुळे कुटुंबात तंटेबखेडे होऊ शकतील.

सात-बारा उतारे मिळविणे, जमीन मोजणी संर्दंभात प्राथमिक तयारी करणे यासाठी खालील प्रकारचे खर्च आहेत –

  • सरकारकडे सात-बारा उतारे, जमीन मोजनीसाठी भरावयास लागणारी फी
  • आपले काम वेळेत होण्यासाठी द्यावयास लागणारी चिरीमीरी
  • जमीन मोजनीपूर्वी जागेची साफसफाई करणे आणि
  • मुंबईहुन गावास जाण्यासाठी होणार प्रवासखर्च

वरील क्रमांक १ ते ३ वरील खर्च नगण्य असले तरी प्रवासासाठी होणारा खर्च हा कितीवेळा गावी हेलपाटे मारावयास लागतात यावर अवलंबून असतो आणि त्यापेक्षाही या कामासाठी नोकरीधंद्यामधुन वाया जाणारा महत्वाचे वेळ हा पैशातही मोजता येत नाही.

संस्थेकडून मिळू शकणारे सहाय्य

तलाठी कार्यालयातून सात-बारा उतारे मिळविणे, जमीन मोजनीसाठी भुमि अभिलेख कार्यालयाशी संर्पकात राहून जमीन मोजनीबाबतची पुर्वतयारी करणे याबाबी संस्थेच्या सभासदास सुसह्य व्हाव्यात या हेतून फळसेवाडी हितकारी संस्था संस्थेमार्फत सशुल्क सहाय्य करु इच्छिते.

संस्थेचा यामागे दुहेरी हेतु असुन –

  • पहिल्या हेतुअन्वये मुंबईस्थित ग्रामस्थाचा तो नोकरीधंद्यासाठी मुंबईत असतांना याकामासाठी लागणार महत्वाचा वेळ वाचावा आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळी प्रवासावर होणारा अनाठायी खर्च कमी व्हावा आणि
  • दुसरा हेतु म्हणजे वाडीतील जे स्थानिक ग्रामस्थ शिक्षित आणि माहितगार आहेत त्यांचा फावला वेळ यासारख्या लोकोपयोगी कार्यास लागून त्याचबरोबर त्यास आर्थिक लाभ देखील व्हावा.

याबाबतचे सर्व आर्थिक व्यवहार संस्थेमार्फतच होणार असल्याकारणे उपभोक्त्यास काम पुर्ण होण्याची तसेच आर्थिक व्यवहार संपूर्णत: पारर्दशक असल्याची खात्री मिळेल.

या कामासाठी सरकारकडून आकारण्यात येणारे शुल्क, लागणारा कालवधी आणि नेमणूक करण्यात आलेला स्थानिक प्रतिनिधी यासंबधी माहीती खालील प्रमाणे आहे.

In:
Share:
Likes:
2 Likes