वाडीवर वाहनरस्त्याची सुविधा तसेच रस्त्याचे डांबरीकरण
वाडीवर वाहनरस्त्याची सुविधा तसेच रस्त्याचे डांबरीकरण
दिनांक १५ एप्रिल २०१७ रोजी विशेष सर्वसाधारण सभेत मांडलेला प्रस्ताव
मुख्य रास्ता
कणकवली आचरा रोड फळसेवाडी शाळा ते गाडीतळ
आपल्या वाडीवर सध्या कणकवली आचरा मुख्य रस्त्यापासून वाडीवर येणारा फळसेवाडी मुख्य रस्ता असून तो बाम्हणदेवाच्या विहिरीपर्यंत जातो या रस्त्यामधील तावडेचिंच ते तांबळ (देवाचा आंबा) याभागाचे डांबरीकरण झालेले नाही.
वाडीतील रस्ते
१. गाडीतळ ते टेंब
वाडीतील टेंबावर राहणारया ग्रामस्थांसाठी सोय व्हावी तसेच अडीनडीला / आजारीपणात गाडीतळ ते पांडूरंग सावजी राणे यांचे घर येथपर्यत वाहनाने जाता यावे या उध्देशाने फळसेवाडी हितकारी संस्थेने यामार्गावर वाहनरस्ता बनविण्याचा प्रयत्न सप्टेंबर २०१३ पासून चालविला आहे. या रस्त्याची प्राथमिक आखणी झालेली असून त्यासाठी जवळपास रु.२२५,०००/- इतका खर्च देणग्या मिळवून संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. या रस्त्याची आखणी रस्त्याचा फायदा टेंबावरील ग्रामस्थांबरोबर आवटातील ग्रामस्थांना देखिल होईल याचा पुर्ण विचार करून करण्यात आलेली आहे.
या गाडीतळ ते पांडूरंग सावजी राणे रस्त्यास वाडीतील ग्रामस्थ आणि महत्वाचे म्हणजे फळसेवाडी हितकारी संस्था सभासद श्री अभयनाथ भगवान साटम यांनी आक्षेप घेतला होता.
- प्रथमत: त्यांस विचारणा करण्यात आली नाही म्हणून आक्षेप घेतला,
- नंतर रस्ता बनविताना त्यांचे घर पाडण्यात आले असा कांगावा करून पोलिस स्थानकात श्री रत्नाकर नाना राणे (स्थानिक कंत्राटदार) यांचेविरुध्द तक्रार करून त्यांनी रस्त्यास आक्षेप घेतला.
- त्यापुढे फेब्रुवारी २०१४ मध्ये लिगेश्वराच्या देवाळात आमरण उपोषण करण्याची धमकी देऊन रस्ता ग्रामपंचायत नमुना क्रमांक २३ (जुना नमुना क्रमांक २६) ला लावण्यास आक्षेप घेतला.
- त्यानंतर श्री अभयनाथ भगवान साटम यांचा आक्षेप हा प्रयोजित रस्ता त्यांचे घराजवळून जातो म्हणून होता (आवाटातील बरयाच घराच्याजवळून हा रस्ता जात असून देखील कोणाही ग्रामस्थाने या रस्त्यास आक्षेप घेतलेला नाही).
- त्यानंतर श्री अभयनाथ भगवान साटम यांनी त्यांचा कौटुबिक तंटा ग्रामपंचायतीने आणि पिसेकामते विकास मंडळाने पुढाकार घेऊन सोडविला तरच ते रस्त्यास परवानगी देतील अशी अट घातली.
श्री अभयनाथ भगवान साटम हे वेळोवेळी काही ना काही कारण काढून या रस्त्यास आक्षेप घेत असल्यामुळे ग्रामपंचायतीने हा रस्ता नमुना क्रमांक २३ ला ओढण्यास असर्मथता दर्शविली होती. याबाबत सर्वात महत्वाचे म्हणजे या रस्त्यासाठी वापरण्यात आलेली जमीन (गट नंबर ६७५ मधील जमीन) ही साटम कुटुंबियांची सामाईक जमीन असून या जमीनीत अभयनाथ भगवान साटम याचा व्यक्तिश: हिस्सा हा फक्त २०० चौरस फूट इतकाच आहे.
फळसेवाडी हितकारी संस्थेने प्रथमत: पाठपुरावा करून गाडीतळ ते कै विठोबा साटम यांचे घर येथपर्यंतचा १९० रस्ता ग्रामपंचायत नमुना क्रमांक २३ ला लावून घेण्यात यश मिळवले. परंतू त्यापुढील रस्ता श्री अभयनाथ भगवान साटम याने घेतलेल्या वेगवेगळ्या आक्षेपांमुळे नमुना २३ ओढता येऊ शकत नाही असे ग्रामपंचायतीने कळविले होते.
कामांची झालेली पुर्तता
मुख्य रास्ता
कणकवली आचरा रोड फळसेवाडी शाळा ते गाडीतळ
फळसेवाडी हितकारी संस्थेने ग्रामपंचायतीशी संर्पकात राहून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले. संस्थेने सतत पाठपुरावा करुन श्री सुहास राणे, सरपंच यांना या कामाबाबत दखल घ्यावयास लावून काम करुन देण्याचे आश्वासन मिळविण्यात जरी यश मिळविले असले तरी फंडाच्या अभावी मार्च २०१८ पर्यंत काम पूर्ण करुन घेण्यात सफलता लाभली नाही. परंतू दिलेल्या शब्दाखातर मे २०१८ या महीण्यात या रस्त्याच्या काही भागाच्या (अंदाजे ८० मीटर) दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीने आगाऊ कंत्राट देऊन करुन घेतले, फंड उपलब्ध नसतांनादेखील हे काम आगाऊरित्या करुन घेण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुहास राणे आणि स्थानिक ग्रामस्थ श्री अंकुश मारुती राणे यांनी प्रयत्न केले.
वाडीतील रस्ते
- गाडीतळ ते टेंब
जवळपास २०१३ पासून काही अडचणींमुळे प्रतिक्षेत असलेला गाडीतळ ते टेंब या वाहनरस्त्यातील शेवटचा टप्पा म्हणजेच विठोबा साटम घर ते टेंब पांडूरंग सावजी राणे घर हा जवळपास ८२ मीटर लांबीचा (३.५० मीटर रुंदीचा) रस्ता फळसेवाडी हितकारी संस्थेने केलेल्या पाठपूराव्यामुळे ग्रामपंचायतीने दिनांक ८ मे २०१७ रोजी ग्रामसभेत ठराव मांडून (ठराव क्रमांक ४(१)) ग्रामपंचायत नमुना २३ (ताब्यातील रस्त्यांची नोंदवही) ला नोंद करुन घेतला.
श्री गणपती उत्सवादरम्याण ग्रामस्थांस चिखलातून जावे लागू नये या विचाराने संस्थेने श्री दिलिप मालवणकर यांस कंत्राट देऊन या रस्त्याच्या काही भागावर फुटकळ टाकून रस्ता सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या या भागात डोंगरातून वाहून आलेले पाणी रस्त्यावर येऊन रस्ता परत-परत बांधावा लागू नये या हेतूने कै विठोबा साटम यांच्या घराजवळ पाईप टाकण्यात आले आहेत. यासाठी आर्थिक वर्ष २०१८ – १९ मध्ये संस्थेकडून एकूण रु.४८,०००/- इतका खर्च करण्यात आला. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्रयत्न चालू असून त्याची जबाबदारी श्री अंकुश मारुती राणे यांनी घेतली आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यावर टेंबावरील ग्रामस्थांची बाराही महिने मुख्यतो पावसाळ्यात अडीअडचणीच्यावेळी घराजवळ वाहने घेऊन जायची सोय होणार आहे. हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे म्हणून संस्था प्रयत्नशील आहे.
कामांसाठी फळसेवाडी हितकारी संस्थेतर्फे करण्यात आलेला खर्च
| १. संस्थेकडून खर्चासाठी देण्यात आलेली आगाऊ रक्कम – गाडीतळ ते पांडूरंग सावजी राणे घरापर्यंत रस्त्याची आखणी तसेच टेंबावर सपाटीकरण आणि सुरक्षिततेसाठी बांध | २२५,०००/- |
| २. संस्थेकडून करण्यात आलेला खर्च – गाडीतळ ते पांडूरंग सावजी राणे याच्या घरापर्यंत जाणार्या रस्त्यावर प्रविण राणे ते दत्ताराम साटम यांच्या घरापर्यतच्या विभागात फुटकळ टाकणे तसेच विठोबा साटम यांच्या घराजवळ डोंगरातून वाहून येणारे पाणी रस्त्यावर येऊन मातीचा रस्ता परत परत वाहून जाऊ नये म्हणून पाईप टाकून मोरी बांधली | ४८,०००/- |
उर्वरीत कामे
- गाडीतळ ते पांडूरंग सावजी राणे यांच्या घरापर्यंत जाणार्या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करावयाचे आहे. परंतू हे काम खर्चिक असल्यामुळे हे काम ग्रामपंचायतीकडून करुन घ्यावयाचे असून हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सरपंच / ग्रामपंचायतीकडे प्रयत्न चालू आहेत. कसेही करुन पुढील वर्षभरात हे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
- कणकवली – आचरा मुख्य रस्ता ते गाडीतळ या संपूर्ण रस्त्याची डागडुगी / डांबरीकरण करणे तसेच या रस्त्यावर कमीत कमी दोन ते तीन टप्यांवर समोरासमोरुन येणार्या गाडया पास होण्यासाठी मोकळी जागा निर्माण करणे.
- कणकवली – आचरा मुख्य रस्ता ते गाडीतळ या संपूर्ण रस्त्यावर प्रत्येक ३०० ते ४०० मीटर अंतरावर लाईटचे खांब लावून शक्य झाल्यास त्यावर सोलर लाईटची व्यवस्था करणे.
- फळसेवाडी मुख्य रस्त्यावरुन श्री रत्नाकर राणे / श्री मंगेश राणे यांच्या टेंबावरील घरांपर्यंत जाण्यासाठी सध्या वहिवाटीमध्ये असलेला रस्त्यास ग्रामस्थांची मान्यता मिळवून ग्रामपंचायतीमध्ये नोंद करुन घेणे. तसेच त्याचे खडीकरण / डांबरीकरण करुन घेणे.