फळसेवाडी संबधी

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालूक्यात पिसेकामते गावात एकूण सात वाड्यापैकी (कदमवाडी, ब्राम्हणवाडी, गावठंणवाडी, बौध्दवाडी, भोगलेवाडी, मधलीवाडी आणि फळसेवाडी) फळसेवाडी ही वाडी कणकवली – आचरा रोडवर (राज्य मार्ग क्रमांक १८१) कणकवली तालुक्यातील राज्य परिवहन बस स्थानकापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. आचरा रोडवरून फळसेवाडीवर जाण्यासाठी फळसेवाडी शाळा याठिकाणी एक फाटा असून कच्च्या / पक्क्या रस्त्यावरून एक ते दिड किलोमीटर अंतर आत गेल्यावर टेंब व आवाट याठिकाणी ग्रामस्थांची घरे आहेत.

फळसेवाडीमधील ग्रामस्थांनी स्थापन केलेली “फळसेवाडी हितकारी संस्था” ही संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आलेली संस्था असून (नोंदणी क्रमांक – महाराष्ट्र शासन / एफ / १७१२९ / मुंबई / ९२) ग्रामस्थांच्या हितासाठी कार्यरत आहे. फळसेवाडीशी साडेचारशेहुन अधिक ग्रामस्थ संलग्न असून जवळपास ४०० ग्रामस्थ मुंबईत कामाधंद्यानिमित्त वास्तव्यास आहेत व त्यापैकी १७५ हून अधिक ग्रामस्थ (१८ वर्षावरील मुंबईस्थित) फळसेवाडी हितकारी संस्थेचे सभासद आहेत. फळसेवाडीत मुख्यत: टेंब व आवाट याठिकाणी ५० हून अधिक ग्रामस्थ कायम वास्तव्यास आहेत (घरांसंबधी माहिती तक्ता क्रमांक १ मध्ये दिली आहे).

पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीव्यतिरिक्त इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसल्यामुळे वाडीतील बहूतांशी ग्रामस्थ उपजीविकेसाठी बाहेरगावी (मुंबई व इतर ठिकाणी) वास्तव्यास आहेत परंतू ग्रामस्थांस आपल्या गावाविषयी आपुलकी असल्यामुळे वर्षातून किमान दोनवेळा तरी ते आपल्या मुळ गावी भेट देतात. ऑगष्ट / सप्टेंबर महिण्यामध्ये येणारा गणपतीउत्सव तसेच एप्रिल / मे महिण्यातील मुलांना मिळणारी उन्हाळी सुट्टी याकाळात वाडीवर जवळपास २०० हुन अधिक ग्रामस्थ वास्तव्यास असतात.

फळसेवाडी हितकारी संस्थेची प्रमुख उध्दिष्टे

  1. वाडीसाठी पाणवठे, रस्ते, पायवाटा यांची व्यवस्था करणे व त्या सुस्थितीत ठेवणे व त्यांचे नियमन करणे.
  2. वाडीतील विकास कामांवर लक्ष ठेवणे.
  3. वृक्षारोपण करुन वाडीसभोवतालील परिसर सुंदर बनवणे.
  4. पडीक शेतीचा वापर व विकास कसा करता येईल याचा विचार करणे.
  5. शासनाच्या विविध योजना आणून यशस्वीरीत्या राबवणे.
  6. बेरोजगार तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय कसा मिळवता येईल याबाबत मार्गदर्शन करणे.
  7. ग्रामस्थांचा आर्थिक स्तर कसा सुधारता येईल याकरीता विविध उपक्रम राबवणे.
  8. वाडीचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास कसा करता येईल यावर मार्गदर्शन करणे.

 

फळसेवाडीतील घरे

वर्ष घर क्रमांक घरमालकाचे नाव
1976 86 दिनकर संभाजी राणे
1981 87 (१) रविंन्द्र भगवान राणे
1981 87 (२) विठोबा नाना राणे
1981 87 (३) दत्ताराम नाना राणे
1981 87 पांडुरंग सावजी राणे
1982 89 शंकर बाळकृष्ण राणे
1980 91 उदय भगवान राणे
1980 91 वामन श्रीधर राणे
1980 91 मधुसूदन श्रीधर राणे
1980 91 प्रभाकर श्रीधर राणे
1980 91 सुनिल सदानंद राणे
1980 91 यशवंत बाळकृष्ण राणे
1980 91 सुरेश बाळकृष्ण राणे
1980 91 अविनाश बाळकृष्ण राणे
1990 92 (१) वसंत भिकाजी राणे
1990 92 (२) मनोहर भिकाजी राणे
1990 92 (३) सुनिल मोहन राणे
1990 92 अरुण वासुदेव राणे / राजन वासुदेव राणे
1990 93 (१) निळकंठ नारायण राणे
1990 93 विश्वनाथ दिनकर राणे
1990 94 (१) निळकंठ नारायण राणे
1990 94 (२) जनार्दन सिताराम राणे
1990 94 (३) विश्वनाथ दिनकर राणे
1990 94 (४) मेघश्याम नारायण राणे
1990 94 (५) बाबाजी दिनकर राणे
1990 94 बाळकृष्ण आबाजी राणे
1990 94 धोंडू रघुनाथ राणे

 

वर्ष घर क्रमांक घरमालकाचे नाव
95 रत्नाकर नाना राणे
1981 167 सुभाष नाना राणे
1981 167 झिलू राजाराम राणे
1981 167 सविता वामन राणे
1976 174 रामदास मारुती राणे
1961 175 विठोबा साबाजी साटम
2007 176 श्रद्धा चंद्रकान्त नलावडे (सुनंदा)
2008 195 तुकाराम विनायक राणे
1976 202 विजय गणपत आचरेकर
1976 202 श्याम गणपत आचरेकर
1936 209 अभयनाथ भगवान साटम
1936 209 सुलोचना भगवान साटम
1974 225 महादेव गंगाराम राणे
1960 226 वसंत भिकाजी राणे
1968 246 दत्ताराम विष्णु साटम
2016 272 रत्नाकर नाना राणे
1999 278 अरुण वासुदेव राणे
285 श्री धोंडू रघुनाथ राणे
1975 289 धोंडू रघुनाथ राणे
1975 331 सुरेश रघुनाथ राणे
1996 332 अरुण वासुदेव राणे / राजन वासुदेव राणे
1974 333 श्रध्दा चंद्रकात नलावडे
342 मनोहर भिकाजी राणे
2008 384 अंकूश मारुती राणे / आकांक्षा अंकूश राणे
2000 424 मंगेश मनोहर राणे
2001 450 श्रध्दा गोविंद भोगले
2013 450 सुशिला महेन्द्र छेडा